आज आपण वातावरणात होणारे बदल पाहतोय ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव प्रचंड उन्हाच्या लाटा आणि अचानक होणारा बदल या सर्वाला कारणीभूत आहे तो म्हणजे El Nino.
El Nino म्हणजे समुद्रामध्ये होणाऱ्या बदलामुळे तापमान वाढण्याची नैसर्गिक प्रक्रिया होय.

प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढणे ही नैसर्गिक क्रिया आहे, पण यामुळे संपूर्ण जगभरात हवामान बदल होतो. जसे आता भारतात याचा मान्सूनवर मोठा परिणाम झालेला दिसतो. एल निनोचा साधारणत: प्रत्येक दोन ते सात वर्षा दरम्यान प्रभाव दिसून येतो.
प्रशांत महासागरात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे उबदार पाणी पश्चिमेकडे ढकलतात. पण जेव्हा हे वारे संथ होतात, तेव्हा हे पाणी मध्य आणि पूर्वेतील प्रशांत महासागरात साचू लागते. त्यामुळे पाण्याचे सरासरी तापमान वाढते. त्यालाच एल निनो असे म्हणतात.
El Nino एल निनो चा भारतावर परिणाम
एल निनो मुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.
काही भागांमध्ये उष्णता वाढून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतो. दुष्काळी भागात पाणीटंचाईचे सावट वाढते.
पेरणी उशिरा होते, तसेच खरीप पिकांचे उत्पादन घट होऊन जास्त सिंचनाची गरज वाढते.
जनावरांसाठी चारा टंचाई. इत्यादी परिणाम भारतात दिसून येतात.
El Nino एल निनो चा जगावर परिणाम
याचा मुख्य परिणाम हा समुद्रातील जीवसृष्टीवर होतो. जागतिक तापमान वाढ होऊन काही देशांमध्ये वातावरणात अचानक बदल होऊन अतिवृष्टी, दुष्काळ, तर काही देशांमध्ये जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण देखील वाढते.
एल निनो ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. ही क्रिया दर दोन ते सात वर्षांच्या अंतराने वारंवार घडत असते. पण याचा परिणाम प्रत्येक वेळी सारखाच असेल असा नसतो काही वेळा एकदम सौम्य तर काही वेळा त्याची तीव्रता भीषण असते.
एल निनो ही जागतिक हवामानावर परिणाम करणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. भारतात त्याचे सर्वाधिक परिणाम पाहायला मिळतात मान्सून, शेती, पिण्याचे पाणी, दुष्काळ, अतिवृष्टी, अन्नसुरक्षा, जनजीवन या सर्वांवर प्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे हवामानाचा योग्य अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन करणे गरजेचे असते. आधुनिक तंत्रज्ञानामार्फत हवामान निरीक्षण प्रणाली द्वारे प्रभावी आपत्ती व्यवस्थापन केले जाऊ शकते.
हे देखील वाचा शब्दवेल | ऑटोमोबाईल अपडेट | मनोरंजन
El Nino, el nino Marathi mahiti, el nino marathi info, el nino info in marathi, El nino causes,
