Nissan Tekton info in Marathi

Nissan Tekton info in Marathi : जपानी कंपनी Nissan यांनी ९ जुलै रोजी भारतात Nissan Tekton ही मिड साईज एसयूव्ही लॉन्च केली. निसान टेक्टॉन चे सहा व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे या कारची डिलिव्हरी ही साधारण 20 जुलैपासून सुरू होईल. ५ स्टार सुरक्षा मानांकनासह येणारी Tekton उत्तम ड्रायव्हिंग एक्सपीरियंस प्रदान करेल असे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सदर लेखांमध्ये आपण Nissan Tekton संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

Nissan Tekton info in Marathi

निसान टेक्टॉनची भारतीय बाजारपेठेत स्पर्धा ही टाटा सिएरा, सुझुकी विक्टोरिस्, हुंडाई क्रेटा आणि किया सेलटॉस, होंडा इलेव्हेट यांच्याशी असेल. जगभरात प्रसिद्ध असलेल्या ऑफ रोड एसयूव्ही Nissan Patrol त्यापासून प्रेरणा घेऊन या Nissan Tekton गाडीला डिझाईन करण्यात आले आहे. भारतात या कारला बेबी Patrol म्हणून प्रमोट करण्यात आले आहे. रोड प्रेझेन्स, परफॉर्मन्स, सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स च्या बाबतीत ही गाडी एक पाऊल पुढे आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

निसान आणि रेनॉल्ट यांची भारतात व्यावसायिक भागीदारी असल्याने रेनॉल्ट डस्टर च्या प्लॅटफॉर्मवर ही गाडी डेव्हलप करण्यात आली आहे. या कारची किंमत भारतात 10.49 लाख ते 18.59 लाख (एक्स शोरूम) इतकी आहे. सुरक्षेच्या बाबतीत या गाडीला BHARAT NCAP क्रॅश टेस्ट दरम्यान 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. याशिवाय सुरक्षेसाठी यामध्ये 6 एअर बॅग, लेव्हल 2 ADAS, एबीएस, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल सह अनेक आधुनिक फीचर्स ऑफर करण्यात आले आहे.

Nissan Tekton Price किंमत

Nissan Tekton – Price Chart

Nissan Tekton

Variant-wise Price List (Ex-Showroom)

Variant Name Price (INR)
⚡ T280 DCT Variants
Nissan Tekton Tekna+ T280 DCT DCT
18,59,000
Nissan Tekton Tekna T280 DCT DCT
17,79,000
Nissan Tekton N-Connecta T280 DCT DCT
16,49,000
Nissan Tekton Acenta T280 DCT DCT
14,99,000
🔧 T280 MT Variants
Nissan Tekton Tekna T280 MT MT
16,39,000
Nissan Tekton N-Connecta T280 MT MT
14,99,000
🔧 T160 MT Variants
Nissan Tekton Tekna+ T160 MT MT
16,49,000
Nissan Tekton Tekna T160 MT MT
15,39,000
Nissan Tekton N-Connecta T160 MT MT
13,69,000
Nissan Tekton Acenta T160 MT MT
11,79,000
Nissan Tekton Visia+ T160 MT MT
11,14,000
Nissan Tekton Visia T160 MT MT
10,49,000

या कारची किंमत भारतात 10.49 लाख ते 18.59 लाख (एक्स शोरूम) इतकी असून ती तुमच्या शहर व राज्यानुसार वेगवेगळी असू शकते.

Nissan Tekton Features फीचर्स

निसान कंपनीची ही मिडसाईज लक्झरी एसयूव्ही असून यामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत. यामध्ये 10.1 इंच चा मोठा इन्फोटेनमेंट सिस्टीम जो Google built in सपोर्ट सह देण्यात आला आहे.

Nissan Tekton info in Marathi
Nissan Tekton info in Marathi

याशिवाय 10.25 इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर फिनिशिंग सह इंटेरियर, पॅनोरोमिक सनरुफ, ॲम्बीयंट लाइटिंग, आरामदाई व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ड्युअल झोन एअर कंडिशनिंग कंट्रोल, वायरलेस चार्जर, ॲपल कार प्लेसह अनेक आधुनिक फीचर्स यामध्ये ऑफर करण्यात आले आहेत.

Nissan Tekton info in Marathi
Nissan Tekton info in Marathi

Nissan Tekton मध्ये 360 डिग्री कॅमेरा, ADAS LEVEL 2 – लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, 6 एअर बॅग, एबीएस, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, हिल होल्ड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पॅडल शिफ्टर्स असे दर्जेदार फीचर्स देण्यात आले आहेत.

मिड सेगमेंट मधील सर्वात जास्त असा 700 लिटरचा बूट स्पेस Nissan Tekton ऑफर करते. याशिवाय 212 एमएम ग्राउंड क्लियरन्स मिळतो जो भारतीय रस्त्यांसाठी उत्तम आहे.

Nissan Tekton info in Marathi
Nissan Tekton info in Marathi

दमदार लूक

या गाडीचा फ्रेश दमदार लुक चांगला रोड प्रेझेंन्स प्रदान करतो, वाइड फ्रंट ग्रील, एलईडी हेडलाईट, डी आर एल सह फ्रंट बंपर आणि मस्क्युलर बोनेट सह मागील बाजूस युनिक डिझाईन गाडीला एक रगड लुक देतो.

Nissan Tekton color option कलर

Nissan Tekton चे 11 विविध कलर पर्याय उपलब्ध आहेत ज्यामध्ये 5 ड्युअल टोन शेड्स उपलब्ध असतील.

इंजिन पर्याय Nissan Tekton Engine options

Nissan Tekton मध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत यामध्ये टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन त्यामध्ये

  1. 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (तीन सिलेंडर) 100 एचपी आणि 166 एन एम टॉर्क जनरेट करते, सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सह ही गाडी 19.4 के एम पी एल मायलेज देण्यास सक्षम आहे.
  2. 1.3 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (चार सिलेंडर) 163 एचपी आणि 280 एन एम टॉर्क जनरेट करते यामध्ये सहा स्पीड मॅन्युअल गिअर सह, सहा स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय मिळतो हे इंजिन 18.5 के एम पी एल चा मायलेज देण्यास सक्षम आहे.

निसान टेक्टॉन ही स्पर्धात्मक किंमत, आधुनिक फीचर्स आणि चांगला रोड प्रेझेंस सह परफॉर्मन्स देणारी मिड साईझ एस यु व्ही सुरक्षेच्या बाबतीतही उत्तम आहे. या गाडीचे बुकिंग सुरू झाले असून लवकरच ती भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल.

हे देखील वाचा – शब्दवेल

✍ लेखक परिचय
मी योगेश भोवड
मी एक कंटेंट राईटर – मी ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी आणि मनोरंजन या विषयावर लेखन करतो. मला नवीन गोष्टींचा शोध घेणे, तंत्रज्ञानाचे अपडेट समजून घेऊन सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे ही माझी आवड आहे.
🚗 भटकंती करणे 🎥 Video ब्लॉग बनवणे 📰 ऑटोमोबाईल 💻 टेक्नॉलॉजी 🎬 मनोरंजन
🎯 माझे उद्दिष्ट : वाचकांना ताजी, अचूक आणि उपयुक्त माहिती देणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top