Tata Sierra 2025 Marathi info : टाटा मोटर्स हे आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच सुरक्षित वाहन भारतीय बाजारपेठेत आणत असते. टाटा च्या गाड्या सुरक्षित प्रवास आणि कम्फर्ट साठी ओळखल्या जातात. अलीकडेच भारतीय बाजारपेठेत टाटा सिएरा च्या चर्चा होताना दिसत आहेत.

टाटा मोटर्सची नवीन टाटा सिएरा ही 25 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृतपणे लॉन्च झाली आहे. टाटा सिएरा ही प्रथमता 1991 ला लॉन्च केली गेली होती त्यावेळेस रगड लुक दमदार रोड प्रेझेंस साठी ती ओळखली जात होती. भारतातील दमदार एसयूव्ही म्हणून भारतीय ग्राहकानी तिला उचलून धरले होते.

Tata Sierra 2025 Marathi info

त्याचेच न्यू जनरेशन दोन ते तीन दशका नंतर Sierra ही टाटा मोटर्स ने पुन्हा भारतीय बाजारपेठेत आणले आहे. याची चर्चा होत आहे, ती याच्यामध्ये दिलेले फीचर आणि फ्युचरिस्टिक डिझाईन आणि डिफेंडर सारखा तगडा लुक. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे डिफेंडर सारखीच तगडी गाडी आपल्या ताफ्यात बाळगण्याचे स्वप्न जरूर पूर्ण होईल. 16 डिसेंबर पासून या कारचे बुकिंग देखील सुरू होईल. आणि कारची प्रत्यक्ष डिलिव्हरी ही 15 जानेवारी 2026 पासून मिळेल.

भारतात टाटा मोटर नेक्साॅन, टियागो, टीगोर, कर्व, पंच, हॅरियर, सफारी, अल्ट्रोझ आणि इतर कमर्शियल वाहनांची विक्री करते. भारतात टाटा मोटर्सच्या अनेक कार्स तसेच व्यावसायिक वाहने रस्त्यांवर धावतात. टाटा मोटर्स आपल्या वाहनांच्या बिल्ड क्वालिटी साठी ओळखली जाते. सदर लेखामध्ये Tata Sierra चे फीचर्स, किंमत, व्हेरियन्ट इतर महत्त्वपूर्ण बाबींची माहिती घेऊ.

Tata Sierra 2025 Marathi info

सीएरा लॉन्च झाल्यापासून मिडसाईज एसयुव्ही सेगमेंट मध्ये प्रचंड खळबळ उडाली दमदार इंजिन आणि स्पर्धात्मक किमतीमुळे हा भूकंप आला आहे 34 वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या रूपात आकर्षक डिझाईन सह भारतीयांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे.

किंमत Tata Sierra 2025 Price

टाटा मोटर्स इतर कंपन्यांना आव्हान देण्यासाठी या कारची किंमत ही स्पर्धात्मक ठेवली आहे. टाटा सिएराचे बेस व्हेरियंट हे ११.४९ लाख रुपये (एक्स शोरूम) इतके आहे.

इंजिन Tata Sierra 2025 Engine

नवीन Tata Sierra मध्ये शक्तिशाली इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. नवीन १.५ लिटर टि जी डी आय हायपीरीयन टर्बो पेट्रोल इंजिन, जे 170 पीएस पॉवर आणि 280 एन एम पार्क जनरेट करते यामध्ये १.५ लिटर डिझेल इंजिनचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

Engine option इंजिन पर्याय

Tata Sierra मध्ये व्हेरीएंट नुसार वेगवेगळे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये…

  • 1.5L Revotron. | PS@rpm 106@6000 | Torque@rpm 145NM@2100rpm | CC 1498
  • 1.5L Revotron | PS@rpm 106@6000 | Torque@rpm 145NM@2100rpm | CC 1498
  • 1.5L Hyperion | PS@rpm 160@5000 | Torque@rpm 145NM@1750-4000rpm | CC 1498

Transmission

  • 6 Speed Manual Transmission
  • 6 Speed Automatic transmission
Tata Sierra 2025 Marathi info
Tata Sierra 2025 Marathi info

Tata Sierra 2025 Dimension

  • 4340×1841×1715
  • Tata Sierra मध्ये 2730 एम एम व्हीलबेस सह 205 एम एम ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. त्यामुळे तुम्ही उत्तम प्रकारे ऑफ रोडिंग सह आनंदायी प्रवास करू शकता. यामध्ये या सेगमेंट मधील सर्वात जास्त म्हणजे 622 लिटर चा बूट स्पेस मिळतो तसेच चांगलं टर्निंग रेडियस टाटा ऑफर करते.
  • फ्यूल टॅंक कॅपॅसिटी 50 लिटर
  • सीटिंग कॅपॅसिटी 5
  • 17 inch अलॉय व्हील

Tata Sierra 2025

कलर Tata Sierra 2025 Colour Options

Tata Sierra 2025 Colour Options
Tata Sierra 2025 – Colour Options
Sample Colour Colour Name Finish
Andaman Adventure Dual Tone
Prestine White Dual Tone
Pure Grey Dual Tone
Bengal Rouge Dual Tone
Coorg Cloud Dual Tone
Munnar Mist Dual Tone

व्हेरीएंट Tata Sierra 2025 Verient

टाटा सिएरा चे वेगवेगळे व्हेरिएंट कंपनीने लॉन्च केले असून त्यांची किंमत ही व्हेरियंटनुसार आणि वेगवेगळ्या शहरानुसार वेगवेगळी असू शकते.

Tata Sierra 2025

हे देखील वाचा Tata Harrier ev

इतर वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सने सिएरा मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम संगम साधला आहे या एसयूव्ही मध्ये 5g कनेक्टिव्हिटी, डॉल्बी ऍटमॉस साऊंड सिस्टिम, पॉवर्ड अँड व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, सुरक्षेच्या बाबतीत टाटा मोटर्स ही अग्रेसर आहेत या एसयूव्हीला देखील फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे तसेच सुरक्षितते संदर्भात मानांकांची पूर्तता करणारी म्हणून एसयूव्ही अशी ही जी ओळख आहे यामध्ये सहा एअर बॅग मुलांच्या सुरक्षिततेसाठी आयसोफिक्स माउंट इत्यादी फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत आणि या एसयूव्ही ला भारतीय बाजारपेठेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

टाटा सिएराचे इलेक्ट्रिक व्हर्जन तसेच सीएनजी व्हर्जन सुद्धा लवकरच कंपनी लॉन्च करणार असल्याची शक्यता आहे सध्या बाजारपेठेत टाटा मोटर्सने पेट्रोल आणि टर्बो पेट्रोल व्हर्जन लॉन्च केले आहेत.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. www.tatamotors.com

✍ लेखक परिचय
मी योगेश भोवड
मी एक कंटेंट राईटर – मी ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी आणि मनोरंजन या विषयावर लेखन करतो. मला नवीन गोष्टींचा शोध घेणे, तंत्रज्ञानाचे अपडेट समजून घेऊन सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे ही माझी आवड आहे.
🚗 भटकंती करणे 🎥 Video ब्लॉग बनवणे 📰 ऑटोमोबाईल 💻 टेक्नॉलॉजी 🎬 मनोरंजन
🎯 माझे उद्दिष्ट : वाचकांना ताजी, अचूक आणि उपयुक्त माहिती देणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top