Tesla Roadster info in marathi : टेस्लाने SpaceX च्या मदतीने त्यांची नवीन फ्लाईंग कार रोडस्टर चे 15 ऑक्टोबर 2026 रोजी टेक्सास मध्ये स्पेस एक्स टेस्टिंग सेंटरवर अनावरण केले.

जगभरात तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुरू असलेल्या स्पर्धा, चढाओढी पाहता, रोज नवीन अपडेट आणि नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळत आहे. अमेरिकन कंपनी टेस्लाने आपली पहिली उडणारी कार रोडस्टर प्रोटोटाईप चे अनावरण केले.
Tesla Roadster info in marathi
टेस्ला रोडस्टर
Tesla ने या अगोदर 2017 मध्ये रोडस्टर ची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात तिचे लॉन्चिंग हे अनेकदा पुढे ढकलण्यात आले. टेस्ला कंपनीने आता नवीन जनरेशन रोडस्टर कार सादर केली आणि तिचे थेट प्रक्षेपण ही केले.
टेस्ला रोडस्टरचे अनावरण
या अनावरणात नवीन जनरेशन रोडस्टर ही कार मोठ्या अशा वक्राकार रॅम्पवर 180° पंख्यांवर आधारित सक्शन प्रणालीमुळे पूर्णता उलटी चिकटून राहिली तसेच गॅस थ्रस्टरच्या मदतीने हवेत झेपावली आणि सुरक्षित लँड ही झाली.
भारतातील ऑटोमोबाईल मार्केट मध्ये Tesla Model Y ची इंट्री

किंमत आणि लॉन्च तारीख Tesla Roadster price
हवेत उडण्याची क्षमता असलेल्या या नवीन कार मध्ये अनेक आधुनिक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत. रोडस्टरची किंमत अजून जाहीर झालेली नसून, याचे उत्पादन साधारण वर्षभरानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने या आधीही अनेकदा तारखा पुढे ढकलल्या आहेत.
टेस्ला रोडस्टर ही पूर्णतः इलेक्ट्रिक कार असून देखील ती ट्रस्ट कसा निर्माण करते हा एक प्रश्नच आहे? मिळालेल्या माहितीनुसार टेस्ला रोड स्टार च्या आत असलेल्या सिलेंडर द्वारे थ्रस्ट निर्माण व नियंत्रित करून कार हवेत उडते. (सी ओ पी व्ही) कंपोझिट ओव्हरेप्ड प्रेशर वेसेल या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी हेक्सगॉन मास्टरवर्क speceex ने विकत घेतली त्याचा फायदा टेस्लाला मिळाला. स्पेस एक्सच्या रॉकेटमध्ये देखील सीओपीव्ही चा वापर केला जातो.
रॉकेट सारखी पॉवर
रोडस्टर मध्ये copv च्या आत मध्ये प्रेशर साठवून ठेवला जातो व तो नियंत्रित केला जातो. copv हे तंत्रज्ञान जरी नवीन नसले तरी याचा आज पर्यंत कोणी कार मध्ये उपयोग केला नव्हता. ही पहिलीच वेळ आहे की, याचा उपयोग करून हवेत उडणारी कार टेस्ला ने विकसित केली आहे. हवेचा दाब नोजल द्वारे बाहेर फेकला जातो त्यामुळे हा प्रेशर कारला उडण्यास मदत करतो.

तसेच ही कार एका सेकंदात 60 mph चा वेग पकडते हे प्रत्यक्षिका दरम्यान दाखवण्यात आले.
Tesla flying car launch date
सुरुवातीला 2008 मध्ये ही कार लॉन्च करण्यात आली होती पण 2012 ला याचे उत्पादन पूर्णतः बंद करण्यात आले व नवीन मॉडेलचा प्रोटोटाइप 2017 मध्ये पुन्हा दाखवण्यात आला, त्याला देखील विलंब झाला. त्यानंतर आज Tesla ने नवीन जनरेशन Tesla Roadster चे अनावरण करून एक सुखद धक्का दिला. एलोन मस्क यांनी स्पष्ट केले की प्रत्यक्षात उत्पादन हे 2028 नंतर सुरू हो होणार आहे, त्यामुळे भविष्यात आपणास रस्त्यांवर चालणाऱ्या तसेच हवेत उडणाऱ्या कार प्रत्यक्षात पाहायला मिळू शकतात.
हे देखील वाचा- शब्दवेल
