Avore EX Electric motorcycle launch : समर्थ ई-मोबिलिटी आणि अवोर इलेक्ट्रिक यांनी आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक AVORE EX भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे या बाईकची किंमत ही 1,24,999/-एक शोरूम इतकी ठेवली असून अहमदाबाद येथे 28 जुलै 2026 रोजी याचे अनावरण करण्यात आले. या बाईकचे लोकार्पण गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याद्वारे करण्यात आले. ही इलेक्ट्रिक बाईक ही पूर्णतः भारतीय बनावटीची असून ती 260 किलोमीटर इतकी रेंज देण्यात सक्षम आहे.
Avore EX Electric motorcycle launch

Avore EX Electric motorcycle Verients
कंपनीने EX1, EX2 सह EX 2S असे एकंदरीत तीन व्हेरिएंट सध्या लॉन्च करण्यात आले. याची डिलिव्हरी साधारणता दोन महिन्यात सुरू होईल.
बॅटरी आणि चार्जिंग (Avore EX Electric motorcycle)
या इलेक्ट्रिक बाइक मध्ये इनबिल्ड 1500W चा फास्ट चार्जर ऑफर करण्यात आला आहे ज्यामुळे तुम्हाला दरवेळी चार्जिंग स्टेशन शोधण्याची गरज भासत नाही तुम्ही घरच्या 5A पासून 15 A च्या सॉकेट मधून देखील चार्जिंग करू शकता. या बाईकची बॅटरी ही दोन तासात साधारण 20 ते 80 टक्के चार्ज होते तसेच चार तासात पूर्ण चार्ज होते.

या इलेक्ट्रिक बाइक मध्ये व्हेरिएंट नुसार EX1 या बेस् वेरीएंटमध्ये 3.24 किलोवॅट बॅटरी पॅक सह 160 किलोमीटर रेंज मिळते. 7.5kW मोटर 250 एन एम टॉर्क जनरेट करते. या वेरियंटमध्ये बाईक सह 750 वॅट चा चार्जर ऑफर करण्यात येतो.
EX2 या मीड वेरियंटमध्ये 5 किलोवॅट बॅटरी पॅक 7.5kW मोटर, 250 एन एम टॉर्कसह सह 225 किलोमीटर रेंज मिळते. या व्हेरियंटमध्ये 1500W चार्जर मिळतो. या मिड वेरियंटमध्ये रिवर्स, इको, सिटी आणि स्पोर्ट हे ड्रायव्हिंग मोड मिळतात. यामध्ये रिव्हर्स, इको, सिटी, स्पोर्ट इत्यादी मोड मिळतात.
तर EX 2S या फ्लॅगशीप व्हेरियंटमध्ये 10.5kW मोटर, 250 एन एम टॉर्क सह 5 किलोवॅट बॅटरी पॅक 260 किलोमीटर रेंज मिळते. या फ्लॅगशीप व्हेरियंट मध्ये 1500 W ऑन बोर्ड फास्ट चार्जर मिळतो. यामध्ये रिव्हर्स, इको, सिटी, स्पोर्ट, अपेक्स, SYFT इत्यादी रायडिंग मोड देण्यात आले आहे.
वरील 3 व्हेरियंट पैकी फक्त टॉप वेरियंटमध्येच 7 इंच डजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल टच स्क्रीन कलर टीएफटी डिस्प्ले ऑफर करण्यात आला आहे इतर दोन वेरियंटमध्ये नॉर्मल कलर टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे.

फीचर्स Avore Electric motorcycle features
प्रोजेक्टर हेडलॅम्प सेटअप सह डि आर एल, एलईडी इंडिकेटर,7 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, आरामदायी स्पीड सीट, 6 रायडिंग मोड, क्लच सह गिअर, 114 KmH टॉप स्पीड, 260 किलोमीटर रेंज, दोन तासात 0-80% चार्ज इ. 100% चार्जिंग साठी चार तास लागतात. या बाईकची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आय सी ए टी द्वारे प्रामाणिक आहे. आधुनिक फीचर्स आणि भारतीय तंत्रज्ञान, त्यांचा अनोखा संगम साधत पूर्णतः नवीन EX series लॉन्च करण्यात आली आहे. दमदार डिझाईन सह, तीन कलर पर्याय देण्यात आले आहेत रायडिंग अनुभव उत्तम बनवण्यासाठी कम्फर्ट सह विविध रायडिंग मोड देण्यात आले आहेत जे गियर द्वारे आपण बदलू शकतो.
किंमत Avore Electric motorcycle Price
सध्या या इलेक्ट्रिक बाइक ची किंमत ही पहिल्या दहा हजार ग्राहकांसाठी 1,24,999/- इतकी ठेवली असून त्यानंतरच्या ग्राहकांसाठी याची मूळ किंमत ही 1,34,999/- इतकी असेल. कंपनीने बुकिंग ची व्यवस्था वेबसाईटवर चालू केली असून तीन व्हेरिएंट साठी 799 रुपये भरुन तुम्ही बुकिंग करू शकता.
हे देखील वाचा – Honda Adv 160 | shabdvel
