Kartoli Bhaji : साधारण जून महिन्याच्या सुरुवातीस आपणास बाजारात एक भाजी दिसून येते कारल्यासारखीच असणारी ती म्हणजे करटोली. या भाजीला वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी नावे आहेत कंटोली, रान कारली, कर्टुली इत्यादी. साधारण जुलै ते डिसेंबर यादरम्यान या भाजीला बहर येतो. वेलवर्गीय असणारी ही वनस्पती कोकणासह, विदर्भ, पश्चिम घाट परिसरात आढळून येतात. अलीकडच्या काळात शेतकरी देखील आपल्या शेतामध्ये या भाजीची लागवड करतात. सातपुडा च्या पर्वतरांगांमध्ये देखील ही भाजी मोठ्या प्रमाणात आढळते येथील आदिवासी बांधव हे पारंपरिक अन्न म्हणून सेवन करतात, तसेच विक्रीसाठी देखील एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवतात.

Kartoli Bhaji
Kartoli Bhaji

वेलवर्गीय असणाऱ्या या वनस्पतीला जून महिन्याच्या दरम्यान फुले येतात व गोलाकार अंडाकृती फळे येण्यास सुरुवात होते फळांचा रंग हा साधारण पिवळसर हिरवा असून पृष्ठभागावर काटेरी आवरण असते. या फळांची चव ही साधारण तुरट असते. पिकलेल्या फळांमध्ये कारल्यासारख्या लहान लाल बिया आढळून येतात.

Kartoli bhaji (Spine Gourd health benefits) करटोलीचे औषधी गुणधर्म

करटोली भाजी ही डोकेदुखी वरती उत्तम औषध असून करटोलीच्या पानांचा रस देखील औषधी असतो. या भाजीमध्ये प्रथिने, लोह, भरभरून असतात व यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. 100 ग्रॅम करटोली मध्ये साधारणतः 17 कॅलरीज आढळतात.

या भाजीच्या मुळाशी आढळणारा कंद देखील औषधी आहे. भाजलेल्या कंदाचा उपयोग मुळव्याधामुळे होणाऱ्या रक्तस्त्रावावर उपयोगी ठरतो. तसेच हा कंद कफ नाशक असून बद्धकोष्ठता यावर गुणकारी आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.

Spine Gourd (Kantola) – Nutritional Value

🥒 Spine Gourd (Kantola)

Nutritional Value per 100g | करटोली

Macronutrients & Moisture

Calories
17–25 kcal
Moisture
84–86 g
Carbohydrates
3.5–7.7 g
Dietary Fiber
3.0–3.3 g
Protein
0.9–3.1 g
Fat
0.1–3.1 g

Vitamins & Minerals

Vitamin C (Ascorbic Acid)
Up to 134 mg ⭐
Carotene / Vitamin A
Rich Source 🥕
Potassium
~582 mg
Calcium
~33–72 mg
Iron
~0.9–4 mg

kartoli recipe in marathi, Spine Gourd Recipe in Marathi, kartoli bhaji, करटोली

Kartoli Bhaji Recipe – Spine Gourd Recipe

करटोली ची भाजी म्हणजे सुपरफुड म्हणू शकतो, कारण या भाजीमध्ये लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. या भाजीची रेसिपी पाहू. Spine Gourd Recipe

करटोलीची भाजी – पावसाळी स्पेशल
🍃
🌿
🍂
🍃

करटोलीची भाजी

🌧️ पावसाळी रानभाजी स्पेशल 🌧️
⚠️
टीप: करटोलीची पिकलेली फळे शक्यतो टाळावीत. नेहमी कोवळी आणि हिरवी फळे निवडावीत जेणेकरून भाजी चविष्ट लागेल.

🛒 साहित्य (४ जणांसाठी)

🥒 करटोली पाव किलो
🧅 कांदे २ लहान
🌶️ हिरव्या मिरच्या २-३
🌿 कढीपत्ता चिमूटभर
🌱 कोथिंबीर चिरून
🧂 मीठ चवीनुसार
🟡 मोहरी १/२ टे.स्पून
🟤 जिरे १/२ टे.स्पून
💧 हिंग १/२ टे.स्पून
✨ हळद १/२ टे.स्पून

👩‍🍳 बनवण्याची पद्धत

१
करटोलीची फळे स्वच्छ धुऊन घ्या. तुमच्या सोयीप्रमाणे गोल अथवा उभे पातळ चिरून घ्यावी. सोबत कांदा बारीक चिरून घ्यावा.
२
शेगडी वरती एका कढईत तेल तापण्यास ठेवावे. साधारण तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून मस्त अशी फोडणी तयार करून घ्या. यामध्ये कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या.
३
कांदा लालसर झाल्यानंतर यामध्ये आता चिरलेली करटोली घालून व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्या. गरजेनुसार थोडेसे पाणी टाकून चवीनुसार मीठ घालून गॅस मंद आचेवर ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्या.
४
पाच मिनिटानंतर त्यावर कोथिंबीर घालून थोडा वेळ भाजी शिजू द्या.
✅ तयार आहे स्वादिष्ट आणि रुचकर अशी आरोग्यदायी करटोलीची भाजी.
एका बाऊलमध्ये सर्व्ह करून घ्या. ही भाजी भाकरी सोबत नक्की ट्राय करा! 😋

हे देखील वाचा – Oats Superfood Benefits in Marathi | शब्दवेल

Kartoli Bhaji Recipe करटोली ही हंगामी भाजी असल्याने पावसाळ्याच्या दरम्यान आपल्या स्थानिक बाजारपेठेत ही भाजी हमखास मिळते ती नक्की ट्राय करा आणि एका आरोग्यदायी प्रथिनांनी युक्त अशा भाजीचा आस्वाद नक्की घ्या.

करटोली च्या भाजीच्या विविध रेसिपी तुम्ही बनवू शकता करटोली मिक्स भाजी सूप, भरलेली करटोली, तवा फ्राय करटोली, करटोलीची सुकी भाजी इत्यादी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top