Ramayana part 1 Trailer review : बहुचर्चित असलेला रामायण भाग १ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. आणि या ट्रेलर ने प्रेक्षक वर्गाची मने जिंकली, नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य दिव्य चित्रपटात भगवान श्रीरामाच्या भूमिकेतील रणबीर कपूर याचा साधेपणा हा हृदयाला स्पर्श करून जातो तसेच रावणाच्या भूमिकेतील कन्नड सुपरस्टार यश चा हिंसक शक्तिशाली अभिनय भाव खाऊन जातो. तर सीतामाईच्या भूमिकेत साई पल्लवी. या चित्रपटाचे चित्रीकरण विलक्षण असून चित्रपटाची सुरुवात ही रावणाच्या कारकिर्दी पासून सुरू होताना दाखवले आहे, रावणाचा अत्याचार प्रचंड वाढल्यानंतर येथे स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आणि धर्म रक्षणासाठी भगवान विष्णू श्री राम अवतार घेतात.
Ramayana part 1 Trailer review

Ramayana part 1 Trailer review
या चित्रपटात धर्माचा अधर्मावरील विजय यावर आधारित युद्ध दाखवले गेले आहे.
Ramayana Starcast
या चित्रपटात अनेक दिग्गजांची वर्णी लागली आहे, सदर ट्रेलर मध्ये रणबीर कपूर सह यश, साई पल्लवी, दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल, रवी दुबे, रकुल प्रीत सिंग, अरुण गोविल त्यांची झलक पाहायला मिळाली.
यांच्यासह या चित्रपटात सनी देओल, विवेक ओबेरॉय, लारा दत्ता, कुणाल कपूर, शिबा चढ्ढा, इंदिरा कृष्णन, सत्येन चतुर्वेदी, कांचन चेतन, परमिंदर चढ्ढा, सुरभी दास, सोनल झा, कुणाल कपूर, अनुपम खेर, आदिनाथ कोठारे इत्यादी स्टारकास्ट ची फौज पाहायला मिळते.
या चित्रपटात आदिनाथ कोठारे हे महत्त्वाच्या भूमिकेत असून त्यांनी प्रभू श्रीरामांचे बंधू भरत यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलर मध्ये प्रभू श्रीराम आणि भरत भेटीचा सीन दाखवण्यात आला आहे यामध्ये आदिनाथ कोठारे यांची झलक पाहायला मिळते.
सनी देओल यांनी भगवान हनुमानाची भूमिका साकारली असून ट्रेलर मध्ये न दिसल्याने चाहते काहीसे नाराज झाले. सोशल मीडिया वरती सनी देओल यांचे नाव प्रचंड ट्रेंड करत आहे, अनेक युजर्स हनुमानाच्या भूमिकेतील त्यांचा लूक लवकर समोर आणावा अशी मागणी कमेंट मार्फत करताना दिसत आहेत.
4000 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
Ramayana movie release date : भव्य दिव्य व्हिज्युअल सह ताकदीची स्टारकास्ट तसेच ए आर रहमान यांचे संगीत आणि जगप्रसिद्ध DNEG कंपनीमार्फत व्हिज्युअल इफेक्ट्स पाहता, हा एक भारतीय चित्रपट इतिहासातील अप्रतिम सिनेमा ठरू शकतो. भल्या पहाटे ब्रह्म मुहूर्तावर रिलीज झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये जगभर प्रदर्शित केला जाणार आहे.
हे देखील वाचा – Raja Shivaji Box Office Collection
