Hyundai Creta facelift 2027 : भारतात सध्या मीड साइज एसयूव्ही New Creta facelift ला भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान पाहिले गेले आहे.

Hyundai Creta facelift 2027
Hyundai Creta facelift 2027

Hyundai Creta facelift 2027

डिझाईन आणि इतर बदल

नवीन जनरेशन क्रेटा मध्ये कॉस्मेटिक बदलांसह पूर्ण नवीन रूपात ही क्रेटा पाहायला मिळेल असे संकेत मिळत आहेत. संपूर्ण डिझाईन हे पहिल्यापेक्षा अधिक भारदस्त आणि रगड लुक सह थोड्या मोठ्या आकारात असेल.

सध्याच्या मॉडेल पेक्षा अधिक आकर्षक आणि प्रीमियम लुक पाहायला मिळू शकतो, टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या मॉडेल्स वरून असे दिसून येते की यामध्ये बरेच मोठे बदल अपेक्षित आहेत. उपलब्ध असलेल्या रिपोर्टनुसार हे केवळ फेसलिफ्ट नसून क्रेटाचे तिसरे जनरेशन असण्याची शक्यता आहे.

Hyundai Creta facelift 2027 फिचर्स

या 2027 मॉडेल मध्ये फ्रंट आणि रियर दोन्ही पूर्णत: नवीन पाहायला मिळेल यामध्ये नवीन अपडेटेड फ्रंट ग्रीलसह, संपूर्ण एलईडी सेटअप, नवीन इंटिरियर, पुरेसा हेडरूम, पॅनोरमिक सनरुप, आणि सुरक्षे संबंधित इतर फीचर्स जसे एअर बॅग्स, एबीएस, ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, मल्टिपल ड्रायव्हिंग मोड इत्यादी.

संभाव्य इंजिन पर्याय

इंजिन पर्यायांमध्ये सध्या हुंडाई, क्रेटामध्ये देत असलेले तीन पर्याय पेट्रोल इंजिन, टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन समाविष्ट असतील. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअर पर्याय मिळण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोल हायब्रीड इंजिन देण्याची हुंडाई ची योजना असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे क्रेटाकडून ग्रँड विटारा आणि टोयोटा हाय रायडर यासारख्या हायब्रीड एसयूव्ही ला थेट स्पर्धा मिळू शकते.

Hyundai Creta facelift 2027
Hyundai Creta facelift 2027

लॉन्च कधी होणार आणि अपेक्षित किंमत

या नवीन जनरेशन हुंडाई क्रेटा ची लॉन्चिंग साधारणतः 2027 च्या पूर्वार्धात केली जाऊ शकते. मात्र अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, लॉन्च नंतर हुंडाई क्रेटा भारतीय बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करेल. तसेच किमती बाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही मात्र केलेले नवीन बदल पाहता त्याची किंमत नक्कीच वाढण्याची शक्यता आहे.

स्पर्धा

या Hyundai Creta facelift 2027 ची स्पर्धा ही सुझुकी ग्रंड विटारा, टोयोटा अर्बन क्रूजर, रेनो डस्टर, होंडा एलिवेट सह किया सेल्टॉस सारख्या मीड साइज एसयूव्ही सोबत होईल.

हे देखील वाचा – 260 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक बाइक Avore EX Electric | शब्दवेल

Nissan Tekton ही मिड साईज एसयूव्ही भारतात लॉन्च

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top