Drishyam 3 review in Marathi : बहु चर्चित असा मल्याळम चित्रपटाचा रिमेक असलेला अजय देवगन चा Drishyam : The Conclusion ( Drishyam 3) हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. ज्या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नेमका कसा आहे चित्रपट ? जाणून घेऊ या लेखात.

Drishyam 3 review in Marathi
Drishyam 3 review in Marathi

Drishyam 3 review in Marathi

चित्रपटाची स्टार कास्ट

अजय देवगन सह तब्बू, जयदीप अहलावत, श्रिया सरण, रजत कपूर, दक्षिणाच्या सुपरस्टार प्रकाश राज, इशिता दत्ता, मृणाल जाधव, कमलेश सावंत, सौरभ शुक्ला, संवेदना सूवालका, रामचंद्र सिंह, अजित सिंह इ.

दोन कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने केली 400 कोटींची कमाई

गुंतागुंतीचा रोमांचक अनुभव

मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक असलेला हा हिंदी चित्रपट मूळ चित्रपटाच्या कथानाकाच्या पलीकडे जात अधिक गुंतागुंतीचा होत जातो. क्राइम थ्रिलर अनुभव देणार हा चित्रपट दृश्यम ची जादू दाखवतो. नायक…कभी जेल नही जाता… हे खरे करत 4 थी शिकलेला साधारण माणूस विजय साळगावकर विरोधकांना कसा पुरून उरतो हे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळवून ठेवते.

Drishyam 3 review in Marathi
Drishyam 3 review in Marathi

मूळ मल्याळम चित्रपटापेक्षा या चित्रपटात बराच बदल करण्यात आला आहे अनेक नवे आणि गुढ प्रसंगांची यात भर घालण्यात आली आहे ‌. विजयने केलेली तयारी, व्युहरचना, आणि सर्व काही करून देखील चेहऱ्यावरचे न बदलणारे भाव. अजय देवगन ने पुन्हा एकदा शांत आणि संयमी अभिनय शैलीने दाखवून दिले संकट किती मोठे असले तरी कसे पेलावे. मराठमोळे कमलेश सावंत पुन्हा एकदा भाव खाऊन जातात. प्रकाश राज यांची भूमिका देखील उत्तम.

कथा

चित्रपटाचे कथानक आपल्या मुलाच्या आरोपींना शिक्षा देण्यात अपयशी ठरल्यानंतर मानसिक खच्चीकरणातुन मीरा देशमुख या आत्महत्येचा प्रयत्न करतात मात्र पती त्यांना असे करण्यापासून थांबवतात आणि क्राईम ब्रँच अधिकारी यांच्या मदतीने आपल्या मुलाचा तपास पुन्हा सुरू करतात, हा तपास विजय साळगावकर यांच्या आयुष्यात वादळ आणण्यास पुरेसा ठरतो. विजय साळगावकर हे पुन्हा चर्चा आणि संशयाचा वेढ्यात सापडतात.

निलंबित अधिकारी गायतोंडे देखील सेवेत पुन्हा रुजू होतात. मीरा देशमुख यांचे वकील विजयला अडकवण्याचे कित्येक प्रयत्न करतात. पण विजय या सर्वांना चेकमेट देतो.

Drishyam 3 review in Marathi
Drishyam 3 review in Marathi

थरार आणि गुंतागुंतीने हा चित्रपट शेवटपर्यंत उत्सुकता वाढवतो तसेच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

कमाईच्या बाबतीत पुढे

गांधी जयंतीच्या सुट्टीचा भरपूर फायदा या चित्रपटास झाला. सॅकनिल्क रिपोर्ट नुसार देशभरात 15735 शो मधून सुमारे 66.74 कोटी रुपये नेट कलेक्शन केले. भारतातील ग्रॉस कलेक्शन हे सुमारे 80 कोटीच्या आसपास झाले आहे तसेच भारताबाहेर 15 कोटी जगभरात 95.10 कोटींच्या आसपास कमाई केली. पहिल्या दिवसाच्या बंपर कमाई नंतर या विकेंड आसपास हा चित्रपट 150 कोटींचा आकडा पार करू शकतो.

हे देखील वाचा – लग्नात मंगलाष्टका का म्हणतात? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top