WhatsApp Parental Control info in Marathi : व्हाट्सअप हे एक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मोफत इंटरनेट मेसेजिंग सुविधा आल्यानंतर व्हाट्सअप ची लोकप्रियता खूप जलद गतीने वाढली 2014 मध्ये मेटाने व्हाट्सअपचे अधिग्रहण केले. पुढे अनेक अपडेट मध्ये व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, स्टेटस, चॅनल, कम्युनिटी अशा अनेक सुविधा वेळेनुसार अपडेट होत गेल्या. थोडक्यात व्हाट्सअप हे माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी वापरले जाणारे बहुउद्देशीय प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक जण आज व्हाट्सअप चा वापर करतो.

WhatsApp Parental Control info in Marathi
WhatsApp Parental Control info in Marathi

WhatsApp Parental Control info in Marathi

whatApp चे फायदे

व्हाट्सअप चे तसे अनेक फायदे आहेत, इंटरनेट द्वारे आपण एकमेकांना टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट शेअर करता येतात, व्हाईस कॉल द्वारे देश विदेशातील लोकांशी संवाद साधता येतो. कौटुंबिक, मित्रपरिवार, विद्यार्थी किंवा कार्यालयीन टीम साठी ग्रुप तयार करून नियोजन करता येते, फाईल शेअरिंग करता येते फोटोज, व्हिडिओज, मजकूर स्टेटस शेअर करता येतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे एन्ड टू एन्ड इनक्रीप्शन, वापरले जाते यामुळे तुमचे वैयक्तिक चाट, कॉल हे सुरक्षित राहतात. व्हाट्सअप बिजनेस मधून व्यावसायिकांना ग्राहकांशी जोडता येते. संपर्क, माहिती, सेवा नियोजनबद्ध करता येतात.

Parental Control feature (WhatsApp Parental Control info in Marathi)

व्हाट्सअप ने लहान मुलांसाठी तसेच किशोरवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी पॅरंटल कंट्रोल हे नवीन फीचर्स आणले आहे यामुळे पालक आणि मुले यांच्यामध्ये समन्वय साधने शक्य होणार आहे.

पालक आणि मुले हे फीचर सेट करू शकतात. याद्वारे काही गोष्टी पालकांना नियंत्रित करता येणार आहेत.

  • मुलाचा प्रोफाइल फोटो कोण पाहणार ते आपणास ठरवता येते.
  • मुलाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये कोण ऍड करू शकतो यावर नियंत्रण, तसेच मुलाने ग्रुप जॉईन किंवा लेफ्ट केल्यास पालकांना त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
  • ग्रुपमधील सदस्य संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर त्याची देखील सूचना पालकांना मिळू शकेल.
  • मेटा ए आय सेटिंग 13 + किंवा लिमिटेड कन्टेन्ट पर्याय दिला जाईल.
  • मुलाचे स्टेटस अपडेट कोणाला दिसावेत तसेच मुलाला कोणाचे स्टेटस पाहता येतील यावर नियंत्रण ठेवता येते.

Parent pin

सुरक्षेच्या दृष्टीने व्हाट्सअप ने आणलेले हे फीचर्स उत्तम असून पालकांनी केलेल्या सेटिंग मध्ये काही बदल करायचा असल्यास पेरेंट सेट पिन आवश्यक असेल त्यामुळे मुलाला परस्पर सेटिंग बदलता येणार नाही.

End to end encryption

व्हाट्सअप द्वारे हे स्पष्ट करण्यात आले आहे की पेरंटल कंट्रोल्स मुळे मुलांचे वैयक्तिक मेसेज कॉल पाहता अथवा ऐकता येणार नाहीत. संपूर्ण चाट आणि कॉल हे end to end encryption द्वारे सुरक्षित राहील.

या नवीन फीचर्स मुळे पालकांना मुलांच्या वापरातील प्रायव्हसी, ग्रुप, चॅनल, स्टेटस आणि मेटा यासारख्या बाबींवर अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे तर मुलांची वैयक्तिक कॉल चाट्स ची प्रायव्हसी कायम राहणार आहे.

हे देखील वाचा – टाटा एरिस चे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

लग्नात मंगलाष्टका का म्हणतात? इतिहास आणि परंपरेचा मागोवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top