Tata Aeris specification in Marathi : भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्स ने आपला बोलबाला कायम राखला आहे. वाहन विक्रीमध्ये देखील टाटा मोटर्सचा वरचा क्रमांक लागतो, टाटा मोटर्स सुरक्षित वाहने बनवणारी कंपनी अशी ओळख भारतीय बाजारपेठेत बनवली आहे.
सदर लेखामध्ये आपण टाटा मोटर्स ने लॉन्च केलेली टाटा एरिस या कॉम्पॅक्ट सेडानचे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहू.

Tata Aeris specification in Marathi
तुम्ही जर तुमच्या बजेट मध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. टाटा मोटर्स ने भारतीय बाजारपेठेत आपली नवी कॉम्पॅक्ट सेडान टाटा एरिस ही 5.29 लाख रुपये (एक्स शोरूम) किमतीत लॉन्च केली आहे. फ्युचरिस्टिक डिझाईन, उत्तम सुरक्षा आणि चांगला रोड प्रेझेंस सह चांगला मायलेज यामुळे ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
टाटा टिगोर ला रिप्लेस करून टाटा मोटर्सने टाटा एरिस भारतीय बाजारपेठेत उतरवली. तसेच समोरील संपूर्ण लुक अट्रॅक्टिव्ह करून इंटिरियर पूर्णतः बदलले आहे. यापूर्वी टाटा टिगोर चे फेसलिफ्ट म्हणून या गाडीला ओळखले जात होते त्याच्या जागी आता टाटा एरिस असे नाव देण्यात आले. टाटा एरिस ही व्यावसायिक सेगमेंटमध्ये विक्री केली जाणार नाही, केवळ वैयक्तिक आणि कौटुंबिक वापरासाठीच असेल त्यामुळे तिची एक वेगळी आणि प्रीमियम ओळख बनेल. (Tata Aeris specification in Marathi)
टाटा पंच इव्ही चार्ज करा आणि मनसोक्त फिरा जाणून घ्या संपूर्ण माहिती काय आहे नक्की खास
फीचर्स
टाटा एरिस मध्ये अनेक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत जसे की एलईडी हेडलॅम्प, डि आर एल्स, 15 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, 10.25 इंच टच स्क्रीन, वायरलेस ॲपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पॉवर विंडो व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, रेन सेन्सिंग वायपर, 360 डिग्री कॅमेरा, 170 एम एम ग्राउंड क्लिअरन्स सह 419 लिटर बूट स्पेस इ. टाटा ऑफर करते.
नवीन इंटिरियर
नवीन टाटा एरिस मध्ये इंटेरियर पूर्णतः ग्रे थीम मध्ये असून यामध्ये टु स्पोक स्टेरिंग, इन्फोटेनमेंट, सेंटर कन्सोल हे पूर्णतः नवीन असून वायरलेस चार्जर, मागे देखील एसी वेंट सह प्रशस्त अशा सीट्स ऑफर करण्यात आल्या आहेत.
इंजिन
टाटा एरिस मध्ये 1.2 L Revotron, 1199 cc, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन जे 113 एमएम टॉर्क आणि 85 बी एच पी पॉवर जनरेट करते. पेट्रोल इंजिन सह सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. 1.2 L आय सी एन जी इंजिन जे 74.5 बीएचपी आणि 96.5 एम एम टॉर्क जनरेट करते यामध्ये देखील 5 स्पीड मॅन्युअल तसेच 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑफर करण्यात आले आहे.
यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार व गरजेनुसार शहरांमध्ये तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पेट्रोल तसेच सीएनजी दोन्ही पर्याय उत्तम आहेत.
ट्रान्समिशन Tata Aeris specification in Marathi
टाटा एरिस मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन चा पर्याय देखील देण्यात आला आहे.
सुरक्षा
टाटा मोटर्स आपल्या सुरक्षित वाहनांसाठी ओळखली जाते, टाटा मोटर्स आपल्या बेस व्हेरिएंट पासून सर्व व्हेरियंट मध्ये सहा एअर बॅग ऑफर करते. याशिवाय सुरक्षा मानांकनामध्ये टाटा एरिसला 5 स्टार सुरक्षा मिळाली आहे.
व्हेरियंट आणि किंमत Tata Aeris varient and price
Tata Aeris
Variant & Ex-Showroom Price
| Variant Name | Ex-Showroom Price |
|---|---|
|
Aeris Smart Petrol MT
1199 cc
Petrol
Manual
|
Rs.5.29 Lakh |
|
Aeris Pure Petrol MT
1199 cc
Petrol
Manual
|
Rs.6.14 Lakh |
|
Aeris Smart CNG MT
1199 cc
CNG
Manual
|
Rs.6.29 Lakh |
|
Aeris Pure Petrol AMT
1199 cc
Petrol
Automatic
|
Rs.6.69 Lakh |
|
Aeris Pure Plus Petrol MT
1199 cc
Petrol
Manual
|
Rs.6.74 Lakh |
|
Aeris Pure CNG MT
1199 cc
CNG
Manual
|
Rs.7.14 Lakh |
|
Aeris Pure Plus Petrol AMT
1199 cc
Petrol
Automatic
|
Rs.7.29 Lakh |
|
Aeris Creative Petrol MT
1199 cc
Petrol
Manual
|
Rs.7.49 Lakh |
|
Aeris Pure CNG AMT
1199 cc
CNG
Automatic
|
Rs.7.69 Lakh |
|
Aeris Pure Plus CNG MT
1199 cc
CNG
Manual
|
Rs.7.74 Lakh |
|
Aeris Creative Petrol AMT
1199 cc
Petrol
Automatic
|
Rs.8.04 Lakh |
|
Aeris Accomplished Petrol MT
1199 cc
Petrol
Manual
|
Rs.8.19 Lakh |
|
Aeris Pure Plus CNG AMT
1199 cc
CNG
Automatic
|
Rs.8.29 Lakh |
|
Aeris Creative CNG MT
1199 cc
CNG
Manual
|
Rs.8.49 Lakh |
|
Aeris Accomplished Petrol AMT
1199 cc
Petrol
Automatic
|
Rs.8.74 Lakh |
|
Aeris Creative CNG AMT
1199 cc
CNG
Automatic
|
Rs.9.04 Lakh |
|
Aeris Accomplished CNG MT
1199 cc
CNG
Manual
|
Rs.9.19 Lakh |
|
Aeris Accomplished CNG AMT
1199 cc
CNG
Automatic
|
Rs.9.74 Lakh |
नवीन टाटा एरिस ची किंमत 5.29 लाख (एक्स शोरूम) पासून सुरु होते. वेगवेगळ्या व्हेरिएंट नुसार या किमती बदलत जातात या गाडीची बुकिंग सुरू झाली असून 11 ऑक्टोबर पासून डिलिव्हरी देखील सुरू होईल.
अनेक रंगांचे पर्याय उपलब्ध
टाटा मोटर्स कडून एरिस मध्ये रंगांचे बरेच पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
| Color Name | Color Swatch |
|---|---|
| Pure Grey | |
| Pristine White | |
| Nitro Crimson | |
| Dune Glow | |
| Daytona Grey | |
| Dandeli Drizzle | |
| Pure Grey-dual Tone | |
| Pristine White Dual Tone | |
| Nitro Crimson With Dual Tone | |
| Dune Glow With Dual Tone | |
| Daytona Grey With Dual Tone | |
| Dandeli Drizzle With Dual Tone |
काय आहे खास
टाटा एरिस मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स ऑफर करण्यात आले आहे ज्यामध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, शहरातील गर्दी पाहता उत्तम अशी कॉम्पॅक्ट कार, 360 डिग्री कॅमेरा, आणि पेट्रोल सह सीएनजीचा पर्याय यामुळे हा एक उत्तम पर्याय ठरतो.
टाटा एरिसची थेट स्पर्धा ही मारुती सुझुकी डिजायर, हुंडाई ऑरा, होंडा अमेझ यांच्याशी असेल तसेच स्पर्धात्मक किमतीमुळे TATA Aeris ही सगळ्यात स्वस्त सेडान आहे. टाटा एरिस ला भारतीय बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळेल. सर्वसमान्यांचे कार घेण्याचे स्वप्न देखील यामुळे पूर्ण होईल.
हे देखील वाचा – शब्दवेल
या लेखातील किंमत, specifications, launch date किंवा इतर माहिती
वेळोवेळी बदलू शकते. खरेदी किंवा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून अद्ययावत माहिती तपासा.
