Maruti Suzuki Wagon R Bioflex : भारतीय रस्त्यांवर सर्वांना परिचित असलेला ब्रँड सुझुकी मोटर्सने त्यांची पहिली बायो फ्लेक्स (Flex fuel) इंधनावर चालणारी पहिली कार लॉन्च केली आहे.
Wagon R ही गेल्या दोन दशकांपासून भारतीयांच्या हृदयावर राज्य करत आहे. अशातच सुझुकी मोटर्सने आपली पहिली बायो फ्यूलवर आधारित पहिली कार भारतात लॉन्च केली आहे. ही कार सामान्य पेट्रोल कारंपेक्षा कशी वेगळी आहे? याचा तुमच्या खिशावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होईल हे पाहू.

Maruti Suzuki Wagon R Bioflex
मारुती सुझुकी वॅगन आर बायो फ्लेक्स ही पहिली हॅचबॅक आहे जी E 85 (85 % इथेनॉल मिश्रित) पेट्रोलवर चालणारी आहे. ही कार E20- E85, यासह शंभर टक्के पेट्रोलवर देखील चालण्यास सक्षम आहे. या नवीन मारुती सुझुकी वॅगन आर मध्ये 1.2 लिटरचे चार सिलेंडर नॅचरली अस्पिरेटेड इंजिन देण्यात आले असून, 5 स्पीड मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे यामध्ये नवीन फ्युल इंजेक्टर, इ सी यु आणि इथेनॉल सेन्सर देण्यात आला आहे विशेष म्हणजे हे इंजिन 91 हॉर्स पावर आणि 114 एन एम टॉर्क जनरेट करते.
सुझुकी मोटर्स वॅगन आर ला 23 ते 24 किमी मायलेज असल्याचा दावा करते.
Maruti Suzuki Wagon R Bioflex वैशिष्ट्य
या कार मध्ये फारसे बदल करण्यात आले नसून पूर्वीच्या स्टॅंडर्ड वॅगनार प्रमाणेच दिसते.
यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्लेसह 7 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम ऑफर करण्यात आली आहे. कारमध्ये बाहेरून कॉस्मेटिक चेंज करण्यात आले असून फ्लेक्स फ्युल ची ब्रँडिंग दिसून येते. इंटिरियर मध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही पहिल्यासारखेच प्रशस्त केबिन 5 सीटर क्षमता आणि तेच आरामदायी सीटस, मात्र इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये तुम्हाला सध्या टाकीत कोणते इंधन आहे याची माहिती देणारा अतिरिक्त इंडिकेटर पाहायला मिळतो.
Maruti Suzuki Wagon R Bioflex इंजिन
व्हॅगनार बायोफ्लेक्स मध्ये केवळ इंधन बदललेले नाही तर इंजिन मध्ये देखील बदल करण्यात आला आहे. यामध्ये सुझुकीचे अत्यंत लोकप्रिय 1.2 L K12 DUALJET Dual VVT इंजिन वापरले आहे. हे इंजिन साधारणपणे 91 बी एच पी पॉवर आणि 114 एन एम टॉर्क जनरेट करते. इथेनॉल हे पेट्रोल पेक्षा अधिक कोरोसिव्ह (गंज निर्माण करणारे) असल्याने बायोफ्लेक्स मॉडेलमध्ये स्टेनलेस स्टीलचे फ्यूल लाइन्स, विशेष प्रकारचे फ्युल इंजेक्टर्स, आणि ॲल्युमिनियम ऐवजी टिकाऊ धातूचे इंजिन वॉल्व्ह देण्यात आले आहेत यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते.
Maruti Suzuki Wagon R Bioflex मायलेज
E20 मिश्रित इंधनावर सामान्य पेट्रोलच्या तुलनेत जवळपास सारखाच मायलेज मिळतो जो की 24 ते 25 किलोमीटर इतका असू शकतो.
तेच E 85 इंधनावर – इथेनॉल ची ऊर्जा क्षमता पेट्रोल पेक्षा कमी असल्याने मायलेज मध्ये 10 ते 15% टक्क्यांनी घट होऊ शकते. इथेनॉल ची किंमत कमी असल्याने इंधनावरील खर्च देखील कमी होतो.
Maruti Suzuki Wagon R Bioflex किंमत
Flex fuel मारुती वॅगन आर ची किंमत 7.24 लाख रुपये एक्स शोरूम जाहीर करण्यात आली आहे. यातील किमतीचा फरक सुमारे 30 ते 45 हजार रुपये जास्त असू शकतो, अगोदरच्या पेट्रोल मॉडेल पेक्षा.
मारुती सुझुकी वॅगन आर बायो फ्लेक्स ही काळाची गरज आहे कारण मारुती सुझुकी वॅगन आर ने ज्याप्रमाणे गेल्या वीस वर्षात भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले त्याचप्रमाणे आता त्यांना आर्थिक बचत आणि पर्यावरण संरक्षणाची संधी देत आहे. इंधनावरील खर्चाची बचत सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला तसेच पर्यावरणाला हातभार लावायचा असेल तर मारुती सुझुकी वॅगन आर बायोफ्लेक्स हा एक चांगला पर्याय आहे जो सीएनजी आणि पेट्रोलच्या मर्यादित उपलब्धतेवर मात करेल.
हे देखील वाचा – Flex Fuel फ्लेक्स फ्युल म्हणजे काय? | शब्दवेल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Wagon R Bioflex बद्दल तुमच्या शंका आणि त्यावरील उत्तरे
तुम्ही या कारमध्ये सामान्य पेट्रोल, E10, E20 किंवा E85 (इथेनॉल ब्लेंड) कोणतेही इंधन टाकू शकता. कारचे स्मार्ट सेंसर आपोआप इंधन ओळखून इंजिन सेट करतात.
अजिबात नाही. Wagon R Bioflex मध्ये इथेनॉल-सुसंगत (Ethanol-compatible) स्टेनलेस स्टील फ्युएल लाईन्स आणि विशेष इंजिन कॉम्पोनंट्स वापरले आहेत, ज्यामुळे गंज धरत नाही आणि इंजिन सुरक्षित राहते.
E20 इंधन वापरल्यास मायलेज जवळपास सारखेच मिळते. परंतु, E85 (जास्त इथेनॉल) वापरल्यास मायलेजमध्ये १०-१५% ची थोडी घट होऊ शकते, तरीही इंधनाच्या स्वस्त किमतीमुळे एकूण खर्च कमीच होतो.
होय, सुरुवातीची किंमत सामान्य पेट्रोल मॉडेलपेक्षा सुमारे ₹३०,००० ते ₹४५,००० जास्त असू शकते. परंतु, इंधनावरील बचतीमुळे हा खर्च १.५ ते २ वर्षांत वसूल होतो.
