TATA Punch ev info in Marathi

TATA Punch ev info in Marathi : भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्स ने खूप छान पद्धतीने कम बॅक केला आहे. भारतात टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहने, एसयूव्ही, हॅचबॅक व सेडान, व्यावसायिक वाहने इत्यादींची विक्री करते. सर्व समान्यांना परवडणारी दर्जेदार व सुरक्षित वाहनांच्या निर्मितीमध्ये टाटा मोटर्सचा वरचा क्रमांक लागतो. सदर लेखात आपण टाटा पंच ईव्ही या बजेट फ्रेंडली कारबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

TATA Punch ev info in Marathi
TATA Punch ev info in Marathi

TATA Punch ev |TATA Punch ev info in Marathi

Tata Punch ev ही मिड साइज एसयूव्ही आहे. टाटा पंचच्या या फेसलिफ्ट मध्ये अपडेटेड बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. यामध्ये 30 किलो वॅट आणि 40 किलो वॅट असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत या दमदार बॅटरी द्वारे टाटा पंच ही 355 ते 468 किलोमीटर रेंज देते (Tata Punch Ev range). डीसी फास्ट चार्जर मुळे चार्जिंग 20 ते 80 टक्के होण्यासाठी फक्त 56 मिनिटांचा कालावधी लागतो. सदर बॅटरी पॅक वॉटरप्रूफ असून या बॅटरीवर आठ वर्षाची वॉरंटी किंवा 1 लाख 60 हजार किलोमीटरची वॉरंटी टाटा मोटर्स देते, याशिवाय आकर्षक डिझाईन आधुनिक फीचर्स आणि वाढीव रेंज

टाटा मोटर्सची ही पहिलीच ॲक्टि.इव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असलेली मिड साईज एसयूव्ही आहे. या प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे या प्लॅटफॉर्मवर 600 किलोमीटर रेंज देणारी देखील गाडी विकसित करता येऊ शकते त्यामुळे भविष्यात पंच मध्ये आपणास हा अपडेट मिळू शकतो.

TATA Punch ev info in Marathi
TATA Punch ev info in Marathi

फीचर्स TATA Punch ev info in Marathi

व्हेरिएंट

नवीन पंच ईव्ही मध्ये स्मार्ट, एडवेंचर आणि इम्पोवर असे तीन मुख्य व्हेरिएंट आहेत.

EV Model Pricing

🚗 Electric Vehicle Models

Premium EV Range – Battery & Pricing Details

Model Name Battery Capacity Price (Ex-showroom)
Smart 30 30 kWh 9.79 Lakh
Smart Plus 30 30 kWh 10.39 Lakh
Smart Plus 40 Popular 40 kWh 11.19 Lakh
Adventure 40 40 kWh 11.94 Lakh
Empowered 40 40 kWh 12.69 Lakh
Empowered Plus S 40 Premium 40 kWh 12.99 Lakh

वरील किमती या तुमच्या शहरानुसार वेगवेगळ्या असू शकतात.

कलर

Dual Tone Color Chart

🎨 ड्युअल टोन कलर ऑप्शन्स

क्र. रंगाचे नाव लुक/स्टाइल
सीवूड ड्युअल टोन प्रिमियम
डेटोनो ग्रे ड्युअल टोन स्पोर्टी
एम्पॉवर ऑक्साईड बोल्ड
प्रिस्टन व्हाईट एलिगंट
फियरलेस रेड आक्रमक
सीवीड / सीव्ह्यू नैसर्गिक

बूट स्पेस

या मीडसाईज एसयूव्ही मध्ये प्रशस्त असा 366 लिटरचा बूट स्पेस टाटा ऑफर करते.

पॉवर अँड टॉर्क

30kWh Battery : 65 kWh – 87 bhp (approx) , 154 NM torque

40kWh Battery : 95 kWh – 127 bhp (approx), 154 NM torque

डायमेन्शन

3880 * 1742 * 1622 mm3 | 2445 व्हील बेस | 366 लिटर बूट स्पेस

ट्रान्समिशन

ऑटोमॅटिक

यासह दहा इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉइस असिस्टंट, रिअर वायपर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, डीफॉगर, टच सेंटर, कन्सोल इत्यादी. सुरक्षेसाठी सहा एअर बॅग्स, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी, 195 मिमी ग्राउंड क्लिअरन्स, आयएसओफिक्स चाईल्ड सीट माउंट, अँटिथेप्ट अलार्म, भारत NCAP 5 STAR रेटिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, डे नाईट रियर मिरर, एबीएस, थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा, सह उत्तम ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करते.

तसेच या नवीन इंटेरियर सह बाह्य बदलांमुळे कारच्या लुक मध्ये भारदस्तपणा आला आहे. साईड प्रोफाइल मध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. तसेच अलॉय व्हील्स मध्ये देखील नवीन डिझाईन ऑफर करण्यात आले आहेत.

टाटा पंच खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनी कडून BAAS (बॅटरी ऍज अ सर्विस) चा पर्याय देखील देण्यात आला आहे याद्वारे ही कार तुम्ही 6.49 लाख रुपयांच्या किमती पासून खरेदी करू शकता.

पहिली कार घेणे म्हणजे फक्त खरेदी नसते, तर ती अनेक वर्षांची बचत मेहनत आणि अनेक स्वप्ना नंतर घेतलेला एक निर्णय असतो. त्यामुळे कार निवडताना फक्त तिचा लुक किंवा फक्त फीचर्स न पाहता खिशाला परवडणारी देखील असावी. तर टाटा पंच हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आकर्षक एसयूव्ही लुक, आधुनिक फीचर्स, इलेक्ट्रिक असल्यामुळे कमी रनिंग कॉस्ट, आणि रोजच्या वापरासाठी उत्तम अशी टाटा पंच ईव्ही कुटुंबाच्या गरजा आणि बजेट यांच्यात उत्तम समतोल साधते.

जर तुम्ही एक उत्तम इलेक्ट्रिक कार शोधत असाल, तर TATA Punch ev हा एक उत्तम पर्याय आहे.

हे देखील वाचा – TATA Harrier ev

फ्लेक्स फ्युल म्हणजे काय? | शब्दवेल

✍ लेखक परिचय
मी योगेश भोवड
मी एक कंटेंट राईटर – मी ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी आणि मनोरंजन या विषयावर लेखन करतो. मला नवीन गोष्टींचा शोध घेणे, तंत्रज्ञानाचे अपडेट समजून घेऊन सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे ही माझी आवड आहे.
🚗 भटकंती करणे 🎥 Video ब्लॉग बनवणे 📰 ऑटोमोबाईल 💻 टेक्नॉलॉजी 🎬 मनोरंजन
🎯 माझे उद्दिष्ट : वाचकांना ताजी, अचूक आणि उपयुक्त माहिती देणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top