How to free up phone Storage info in marathi : आता प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो पण यामध्ये कधी कधी तुम्हाला स्टोरेज अल्मोस्ट फुल (storage almost full), किंवा स्टोरेज फुल (storage full) असा मेसेज वारंवार दिसतो का…दिसत असेल तर इतर बाकीची कामे जसे फोटो काढणे, एप्लीकेशन इन्स्टॉल करणे किंवा एखादा मोठा व्हिडिओ डाऊनलोड करणे, व्हाट्सअप चालवणे कठीण होऊन बसते. अशावेळी काय करावे… यासाठी नवीन फोन घेण्याची गरज नाही पूर्ण फॉरमॅट करण्याची ही गरज नाही.

फोन मध्ये नेमक्या अशा कोणत्या फाईल्स किंवा ॲप्स आहेत. ज्या जास्त जागा घेत आहेत ते शोधून अनावश्यक फाईल डिलीट केल्या तरी वारंवार येणारी स्टोरेज फुल ची समस्या दूर होते.

सदर लेखात अनावश्यक फाईल डिलीट करताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर पाहू.

How to free up phone Storage info in marathi
How to free up phone Storage info in marathi

How to free up phone Storage info in marathi

जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही सेटिंग-स्टोरेज मध्ये जाऊन तुम्ही फोटोज, व्हिडिओज, ॲप्स आणि डाऊनलोड या कॅटेगरी किती स्टोरेज वापरत आहेत हे पाहता येते तसेच काही फोन्स मध्ये cleaner ॲप्स सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत याद्वारे तुम्हाला स्पेस खाली करता येतो.

वरील माहिती पाहिल्यानंतर क्लीन अप कसे करावे हे सहज लक्षात येईल विशेषत: हाय रिझोल्युशन फोटो आणि मोठे 4k व्हिडिओ जास्त जागा घेतात. गॅलरी किंवा फोटो ॲप उघडून डुप्लिकेट फोटो, ब्लर फोटो, जुने स्क्रीन शॉट, व्हिडिओज, स्क्रीन रेकॉर्डिंग, फॉरवर्ड मीडिया यापैकी ज्याची गरज नसेल अशा फाईल डिलीट करू शकता, महत्त्वाचे फोटोज किंवा व्हिडिओज डिलीट करण्यापूर्वी त्यांचा बॅकअप आहे की नाही याची खात्री करा.

व्हाट्सअप आणि इतर ॲप्स मधील डेटा तपासा, यामध्ये व्हाट्सअप टेलिग्राम आणि इतर मेसेज ॲप्स मध्ये आलेले फोटोज, व्हिडिओज, डॉक्युमेंट आणि व्हॉइस फाईल काही वेळानंतर मोठ्या प्रमाणात स्टोरेज व्यापतात. तुम्हाला गरज नसलेले मोठे व्हिडिओज डॉक्युमेंट्स डिलीट करा, विशेषता जुन्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आलेल्या मीडिया फाइल्स कडे लक्ष द्या. अनेकदा आपण ते पुन्हा वापरता ही नाही, पण फोन मध्ये जागा घेत राहतात ऑटो डाउनलोड बंद करा .

डाउनलोड फोल्डर क्लीन करा

कित्येकदा आपण डाऊनलोड केलेले व्हिडिओ पीडीएफ झिप फाइल्स डॉक्युमेंट किंवा इतर फाइल डाउनलोड फोल्डर मध्ये अशाच पडून राहतात. फाईल मॅनेजर उघडून डाऊनलोड फोल्डर तपासा तसेच गरज नसलेल्या फाइल्स डिलीट करा.

वापरत नसलेले ॲप्स अन-इन्स्टॉल करा

अनेकदा आपण एखादे ॲप काही वेळानंतर वापरणे बंद करतो ॲप इंस्टॉल राहिल्यामुळे स्टोरेज वापरली जाते. ॲप मॅनेजर एकदा चेक करून काही महिन्यात न वापरलेले ॲप अनइंस्टॉल करू शकता यामुळे बऱ्यापैकी स्टोरेज पुन्हा वापरात येतो.

न वापरलेले ॲप शोधण्यासाठी फाइल्स बाय गुगल च्या क्लीन सेक्शन चा वापर करता येतो.

Clear Cache

फोन मध्ये ॲप्स वापरताना टेम्पररी फाइल्स (कॅशे) तयार होतात. ॲप मॅनेजर मध्ये Clear Cache आणि क्लिअर स्टोरेज डेटा हे पर्याय असतात कॅसेट क्लिअर केल्याने टेम्पररी डेटा हटतो.

हे देखील वाचा – WhatsApp Parental Control info in Marathi

एखाद्या ॲपचा डेटा क्लियर केल्याने ॲपचा डेटा म्हणजे तुमचे लॉगिन किंवा इतर काही गोष्टी त्या कायमच्या जाऊ शकतात. ॲप वापरताना तर पुन्हा प्रविष्ट करावे लागतात. यासाठी कॅशे क्लिअर करताना करताना. क्लियर डेटा आणि क्लिअर कॅशे नक्की काय करतोय ते एकदा पहा. ऑप्शन निवडताना काळजीपूर्वक पहा.

जंक फाईल

files by Google द्वारे तुम्ही जंक फाईल, डुप्लिकेट फाईल शोधू शकता व डिलीट करू शकता.

ऑफलाइन डाऊनलोड केलेले व्हिडिओ, म्युझिक

youtube, नेट फ्लिक्स किंवा इतर स्ट्रीमिंग सर्विस मध्ये नंतर पाहण्यासाठी ऑफलाइन डाऊनलोड केलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात जागा व्यापतात. तुम्ही जर अगोदरच पाहिलेले किंवा गरज नसलेले डाऊनलोड व्हिडिओ, म्युझिक फाईल काढून टाकल्याने बराच स्पेस मिळतो.

सर्वात उत्तम डिफॉल्ट फाईल मॅनेजर वापरण्यापेक्षा फाइल्स बाय गुगल वापरल्याने अनावश्यक डेटा जसे जंग फाईल डुप्लिकट फाईल डुप्लिकेट फोटोज ब्लर फोटो मोठ्या फाइल्स इत्यादी शोधण्यास मदत होते जर तुम्हास स्टोरेज फुलचा मेसेज वारंवार येत असेल तर वरीलपैकी काही पायऱ्या वापरून तुम्ही बऱ्यापैकी स्टोरेज रिकामा करू शकता.

तुम्ही देखील स्टोरेज फुल च्या नोटिफिकेशनने जर वैतागला असाल तर तुम्ही देखील वरील पायऱ्या वापरून किंवा महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेऊन स्टोरेज मोकळा करू शकता. तसेच महत्त्वाचे फोटो google ड्राईव्ह वर देखील अपलोड करू शकता तेथे तुम्हास फ्री 15 जीबी स्टोरेज मिळतो. 15 gb पर्यंत फोटोज व्हिडिओज तुम्ही तेथे देखील ठेवू शकता.

हेदेखील वाचा – शब्दवेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top